मनपा प्रशासन नाही 'थायावर'; सफाई कामगार सवलत योजना 'वायावर'! पुणे : पदे, पगार अधिकारी अन् ...अन्यथा पालिका आयुक्तावर शिस्तभंगाची कारवाई भ्रष्टाचाऱ्यांशी सोयरीक या कारणांमुळे


पुणे : पदे, पगार अधिकारी अन् .या सवलतींना भ्रष्टाचाऱ्यांशी सोयरीक या कारणांमुळे मनपाच्या विविध कामगार व तत्सम घटकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींना 'चुना' लावला जात असल्याचे समोर येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध योजनांतर्गत दिल्या जाणाऱ्या सवलतींना वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचा प्रकार संबंधित यंत्रणेकडून होत असल्याचे दिसून येत आहे. 'मुकी बिचारी कुणीही हाका' या प्रमाणे सफाई कामगारांना अंधारात ठेवून त्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीबाबत प्रशासन उदासीन आहे. शासनाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आखण्यात आलेल्या विविध योजनांची मनपाकडू न अंमलबजावणी केली जात नसल्याचे राज्य सफाई कर्मचारी आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार सूचना देऊनही कार्यवाही होत नाही. येत्या तीन महिन्यांत कार्यवाही न झाल्यास मनपा आयुक्तांवर कारवाई करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी दिली. मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पवार यांनी नुकतीच मनपात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस मनपा आयुक्त सौरभ राव, उपायुक्त राजेंद्र मुठे, अनिल मुळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांच्यासह अशोक मारूडा, नरोत्तम चव्हाण, नंदुलाल नहारिया, मवनोज मारूडा, प्रेमदास चव्हाण यांच्यासह सफाई कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. __अधिका-यां सोबत झाले ल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आयोगाचे अध्यक्ष पवार म्हणाले, 'सफाई कामगारांच्या प्रश्नासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांना अजिबात गांभीर्य नाही. शासनाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी काढलेले अध्यादेश, योजना यांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून (पान ३ वर)