छत्रपती शिवाजी महाराज, समतावादी संभाजी महाराज, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत लाखो । भिमसैनिकांनी विजयस्तंभाला अभिवादन केले! भिमा कोरेगांव : भिमा कोरेगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो समतावादी, स्वराज्यरक्षक संभाजी


यांच्या घोषणा भिमा कोरेगांव : भिमा कोरेगाव महारणसंग्रामाला २०२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील व देशातील जवळपास लाखो भीमसैनिकांनी भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देऊन या लढाईतील शूरपूर्वजांना शांततेत व शिस्तबध्दरित्या अभिवादन केले. प्रशासनातर्फे पुरविण्यात आलेल्या सो यीसु विधा अपु-या पडल्याने भीमसैनिकांचे हाल झाले. १ जानेवारी २०१८ रोजी भीमसैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे यावर्षी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री मा. रामदास आठवले, राज्य सरकारतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, अॅड. भाई विवेक चव्हाण इत्यादीसह अनेक मान्यवरांनी भिमा कोरेगाव विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून विजयस्तंभाला अभिवादन केले. बार्टीच्या वतीने महासंचालक कैलास कणसे यांनी अभिवादन केले. यावेळी बार्टीतर्फे भीमसैनिकांना भोजनदान करण्यात आले तसेच अल्पदरात ग्रंथ विक्री करण्यात आली व सिंबायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेन्टर व सौ. शिला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट भिमरूग्णसेवा यांच्या माध्यमातून आलेल्या भिमसैनिकांना मोफत औषधोउपचार करण्यात आले. लोणीकंद येथे वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून भिमा कोरेगांव विजयस्तंभ ५ किलो मीटर अंतरावर आहे. भीमसैनिकांना तेथून पायी चालत यावे लागले. त्यामुळे महिला, वृध्द व लहान मुलांचे हाल झाले. प्रशासनातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शौचालयाची व्यवस्थाही अपुरी होती. प्रशासनातर्फे भीमसैनिकांसाठी २६० बसेस सोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र बसेसची संख्या केवळ ५० च होती. त्यामुळे भीमसैनिकांचे हाल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून भिमा कोरेगाव परिसरात मोबाईल जॅमर लावल्याने भीमसैनिकांना एकमेकांना संपर्क करता आला नाही. पुस्तकांच्या स्टॉलसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. या स्टॉलवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबे ड क र यांच्यासह पुरोगामी विचारवंतांवरील पुस्तकांचा समावेश होता. भारतीय संविधानाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. या पुस्तकांच्या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. जुना टोलनाका येथे रिपाइंची सभा पार पडली. या सभेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी संबोधित केले. यावेळी अविनाश छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो समतावादी, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत छत्रपती संभाजी महाराजांच्या छिन्नविछिन्न देहाचे अवयव एकत्र करून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणारे व संभाजी महाराजांचे वढू बु) ता. शिरूर जि. पुणे येथे समाधी बांधणारे शूर गोविंद गोपाळ गायकवाड महार) यांच्या बढू (बु) येथील समाधीला हजारो भीमसैनिकांनी अभिवादन केले. तसेच या भीमसैनिकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीलाही अभिवादन केले. भिमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर दरवर्षी भीमसैनिक वढू गावाला भेट देऊन आपल्या शूर पूर्वजाला तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतात. छत्रपती संभाजी महाराज यांची मोगल सम्राट औरंगजेब यांच्या मदतीने वैदिक धर्म पंडितांनी त्यांच्या सैनिकांकडून अत्यंत क्रुरपणे हत्या केली होती. संभाजी महाराजांचे अवयव इतरत्र फेकले होते संभाजी महाराजांवर कोणी अंत्यसंस्कार केले तर त्यांना फासावर लटकविण्यात येईल. अशी दवंडी मोगल सैनिकांनी दिली होती. परंतु मोगल सैनिकांना व वैदिक धर्म पंडितांना न जुमानता व न घाबरता शूर योध्दा गोविंद गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे अवयव एकत्र करून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले व त्यांची वढू येथे समाधीही बांधली. गोविंद गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांची समाधी संभाजी महाराज यांच्या समाधीसमोरच बांधण्यात आली. महातेकर, काकासाहेब खंबाळकर, राजाभाऊ सरवदे, बाळासाहेब जानराव, डॉ. सिध्दार्थ धेंडे उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेच्या वतीने विजयस्तंभाच्या बाजूला सभा घेण्यात आली. या सभेला आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, संजय देशमुख इत्यादी उपस्थित होते. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीनेही अभिवादन सभा पार पडली. या सभेला आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन केले. थायावर'; सफाई कामगार सवलत यावेळी जयदीप कवाडे, लताताई शिरसाठ, विजय शिंदे उपस्थित होते. भारतीय दलित कोब्राच्यावतीने अॅड. विवेकभाई चव्हाण यांची सभा पार पडली, यावेळी व्यंकटेश मरकळ, अजय शिंदे, शांताबाई काळे इत्यादी उपस्थित होते. याशिवाय अनेक मान्यवरांनी भिमा कोरेगाव विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यात मा. आ. जयदेव गायकवाड, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. उपेंद्र शेंडे, (पान ३ वर)